नंदुरबार: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांना फुप्फुसांचा आजार होता. नाशिकमधल्या खाजगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. माणिकराव गावित हे तब्बल नऊ वेळा खासदर म्हणून संसदेत निवडून गेले होते. त्यांनी देशाचे गृहराज्य मंत्रिपदही भूषवले होते.
दरम्यान, माणिकराव गावित यांच्या पार्थिवावर उद्या नवापूर येथे अत्यसंस्कार होणार आहेत.