Type Here to Get Search Results !

“मी मुख्यमंत्री झालो ही ‘यांचीच’ कृपा आहे”: एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य!



नाशिक : नाशिकच्या तपोवन येथे बी.ए.पी.एस. स्वामीनारायण मंदिर वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठाविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. 


यावेळी बोलतांना, मी मुख्यमंत्री झालो ही “स्वामीनारायण” यांचीच कृपा असल्याचे म्हंटले आहे. या मंदिराच्या भूमीपूजण सोहळ्याला देखील येण्याचे भाग्य लाभले होते त्यानंतर आज तीन वर्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.



तसेच, मंदिर प्रशासनाने जनतेची सेवा करावी त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील याशिवाय, हे तुमचं सरकार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.


दरम्यान, नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या समवेत या सोहळ्याप्रसंगी नव्याने पालकमंत्री झालेले दादा भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies