Type Here to Get Search Results !

पालघरचे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव संख्ये शिंदे गटात सामील!



मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात सुरु असलेले राजकीय युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता पालघरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांनी शिंदे-फडणवीस युती सरकारला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.



पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले. वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला पाठींबा जाहीर केला.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies