Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार २९ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 


मेष:

गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळेल. काही प्रश्न मार्गी लावाल. दिवसभर धावपळ करावी लागेल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील. सामाजिक वादात पडू नका. 


वृषभ:

आर्थिक बाजू स्थिरावेल.  कुटुंबासोबत दिवस मजेत घालवाल. कामातील अडचणी दूर करू शकाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. 



मिथुन:

व्यापारात नवीन भागीदार सापडेल. जोडीदाराकडून लाभ होईल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल. आवडती वस्तु बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. 



कर्क:

कुटुंबासाठी खर्च कराल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य  आणावे. 



सिंह:

गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सहकार्‍यांशी वादात पडू नका.  सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. 



कन्या:

आर्थिक स्थिती चांगली राहील. कामातील बदल लक्षात घ्या. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल.


 

तूळ:

विरोधक पराभूत होतील. कामानिमित्त छोटे प्रवास होतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल. 



वृश्चिक:

सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल. तुमचा उद्देश साध्य होईल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील.  आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. 



धनू:

भावंडांची मदत घ्याल. वैचारिक दिशा बदलून पहा. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला.  भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. 



मकर:

नवीन योजना आखताना सावधानता बाळगा. नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. कामात झालेले नुकसान भरून काढाल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. 



कुंभ:

नातेसंबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांना उत्तम काळ. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. 



मीन:

ज्ञान वाढीस लागेल. घरासंबंधी कामे मार्गी लावा. घरातील वातावरण खेळकर राहील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies