Type Here to Get Search Results !

“पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर”; महिलेला कंटाळून तरुणाची आत्महत्या!






औरंगाबाद : औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील लोहगाव येथील तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश सुभाष मुसळे (रा. लोहगाव ता.पैठण) असे मयत तरुणाचे नाव आहे. 



प्राप्त माहितीनुसार, गावात राहत असलेल्या एका महिलेने काही महिन्यापासून माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवून लग्न कर आणि तुझ्या पत्नीला सोडून माझ्यासोबत संसार कर म्हणून खुप दिवसांपासून तगादा लावला होता. तसेच शेजारी घर असल्याने प्रत्यक्षात भेटून सुद्धा या गोष्टी सदरील महिला बोलत असल्याने या सगळ्या गोष्टीच्या मानसिक ताणाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. 



दरम्यान, याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies