Type Here to Get Search Results !

“.....कारण माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र यांची ताकद आहे”



सातारा: सातारा जिल्ह्यात सहा ग्रामपंचायतीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची समजली जाणारी खेड ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. यामध्ये महेश शिंदे गटाला बारा जागा मिळाल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र पाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.



यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, “दोन खासदार आणि तीन आमदारांनी मला पाडण्यासाठी ताकद लावली होती. मात्र याचा परिणाम झाला नाही. कारण माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र यांची ताकद आहे. त्यामुळे मी काेणालाही घाबरत नाही. हे दाेन्ही नेते केवळ माझ्याच नव्हे तर सामन्यांच्या पाठीशी असल्याचे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies