मुंबई: श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचे निधन आज, मंगळवारी पुण्यात निधन झाले. पुण्यात एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा वयाच्या ७५ व्या वर्षी मृत्यू झाला.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचे साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात भरीव योगदान होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. त्यांच्या काळात त्यांनी समाज उपयोगी विविध कामे केली. सातारच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते. त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.