Type Here to Get Search Results !

“पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा गळा दाबीन....”, ‘हे’ नेते गुलाबराव पाटलांवर संतापले!



मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा गळा दाबीन, असे वक्तव्य औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. आपल्याला राग आला तर काहीही करु शकतो, असेही खैरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यावर नुकतीच गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. त्यावर खैरे संतापले आहेत. जे काय व्हायचं ते होईल, पण गुलाबराव यांना माफी मागायला लावीन, असा इशारा खैरे यांनी दिला आहे.



दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आदित्य ठाकरे होऊ शकतात, त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत. त्यांनी बोलताना त्यांच्या वयाचा विचार करावा. आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाही तर आम्ही बोलण्यात कठीण आहोत, त्यांना आवरण अवघड होऊन जाईल, असा इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंना आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण आदित्य ठाकरेंना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका गुलाबराव यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies