Type Here to Get Search Results !

काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ नेत्याने दिला पक्षाला राजीनामा!



गुवाहाटी: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' सुरू आहे, अशातच आता आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कमरूल इस्लाम चौधरी यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. कमरूल इस्लाम यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.



दरम्यान, कमरूल इस्लाम क्रॉस व्होट करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने चौधरी यांनी राजीनामा पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. 'गेल्या काही महिन्यापासून आसाम मधील काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. त्यामुळे सदस्य म्हणून राहण्याचे कोणतेही कारण राहिलेले नाही," असे त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies