Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिंदे सरकार घेणार ‘हा’ निर्णय!



मुंबई: विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील शिंदे सरकार आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा होमवर्क बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळून शकतो. कारण, शाळेतच नोट्स काढून विद्यार्थ्याचा अभ्यास घेतला जाणार आहे.



पुढील वर्षीपासून म्हणजेच 2023 पासून पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात येणार आहे. म्हणजेच मुलांना त्यांच्या वर्गात जी पुस्तके येतील त्या पुस्तकांमध्ये तीन ते चार भागांत विभागणी झालेली असेल. यामध्ये कोरी पाने उत्तरे लिहिण्यासाठी दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies