मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा सेनेचा दसरा मेळावा आम्ही घेणार आहोत असे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधील दोन गटात पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभुमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.
शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी समोपचाराने गोष्टी होईल याकडे लक्ष द्यावे, मेळावे घेण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत पण त्यातून वाद निर्माण होतील अशी भुमिका नसावी, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
दरम्यान, दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यात वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.