Type Here to Get Search Results !

टीम इंडियाच्या ‘या’ स्टार गोलंदाजाला दुखापत; गोलंदाज स्पर्धेतून बाहेर!



मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली असून, काउंटी चॅम्पियनशिपच्या चालू मोसमात तो सहभागी होऊ शकणार नाही. उमेश यादवबाबत क्लब मिडिलसेक्सकडून ट्विट करून माहिती देण्यात आली. 



'आम्हाला घोषणा करताना दुःख होतंय की, उमेश यादव या मोसमातील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये संघात सहभागी होऊ शकणार नाही. तो दुखापतीतून सावरत आहे,' असे ट्विट मिडिलसेक्स क्लबकडून करण्यात आलं आहे. तू लवकर बरा हो, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



दरम्यान,  उमेश यादव दुखापतग्रस्त असल्याने भारतात परतला आहे. सध्या तो रिहॅबमध्ये आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies