Type Here to Get Search Results !

“तुम्ही काहीही करा, पण वेदांता...” 'वेदांता' प्रोजेक्ट वरून ‘यांचा’ शिंदेंना सल्ला!



मुंबई: वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्याने विरोधक आक्रमक झालेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेदांताबाबत एक सल्ला दिला आहे. वेळ पडल्यास दिल्लीत जा, पण वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात परत आणण्याचा आग्रह धरा असेअजित पवारांनी म्हटले आहे.



'वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून राज्यात मोठी गुंतवणूक होणार होती. त्यामुळे महाराष्ट्राला प्रचंड वस्तू व सेवा कर (GST) मिळणार होता. सध्याच्या काळात अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. अशावेळी तब्बल दोन लाख रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे 'इथे राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे. तुम्ही काहीही करा, यासंदर्भात वेदांता समूहाशी बोलून त्यांच्याकडे महाराष्ट्रात परत येण्यासाठी आग्रह धरा', असे अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे.




दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यानिमित्त त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी वेदांता प्रकल्पाबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्लाही दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies