Type Here to Get Search Results !

“.....म्हणून शिवाजी पार्कचा दसरा मेळावा शिंदेंचाच झाला पाहिजे, उद्धव ठाकरेनी इतर कुठे तरी मेळावा घ्यावा”: 'यांचे' मोठे वक्तव्य!



मुंबई: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दसरा मेळाव्याबाबत मोठे वक्तव्य केलेआहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. 



केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले की, "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय. त्यामुळे दसरा मेळाव्याला खऱ्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे." तसेच ते म्हणाले की, " उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही. मात्र शिवाजी पार्कचा दसरा मेळावा जो आहे तो एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्यांना परवानगी द्यावी, अशी आमची महापालिकेला सूचना असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. 



दरम्यान, केंद्रीय मंत्री आज कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत हे वक्तव्य केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies