Type Here to Get Search Results !

पुण्यातील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे नामांतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी बदलले!



मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील वढू बुद्रूक तुळापूर येथील संभाजी राजेंच्या समाधीस्थळाच्या नामांतराचा विषय निकाली काढत तुळापूर येथील छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळाचे नाव पुन्हा 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' करण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यातील वढू बुद्रूक तुळापूर येथील संभाजी राजेंच्या समाधीस्थळाचे खासदार अमोल कोल्हेंनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' असे नामंतरण केले होते.  'स्वराज्य रक्षक संभाजी' याच नावाची मराठी वाहिनीवर अमोल कोल्हेंची मालिका प्रसारीत झाली होती. शिवाय स्थानिक गावकऱ्यांनी देखील संभाजी महाराजांच्या स्मारकाला 'स्वराज्य रक्षक संभाजी' नाव द्यायला विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर गावकर्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी नामांतराचा विषय निकाली काढत तुळापूर येथील छत्रपती संभाजीराजेंच्या समाधीस्थळाचे नाव पुन्हा 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आतापासून या समाधी स्थळाचे नाव हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies