Type Here to Get Search Results !

ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात; २ जिवलग मित्र जागीच ठार!कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील बालिंग्यापासून काही अंतरावरील पाटील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी रात्री ट्रक आणि मोटारसायकलचा अपघात झाला.या अपघातात चिंचवडे उर्फ कळे (ता. करवीर) येथील विकास संभाजी तोरस्कर (२०) आणि ऋषीकेश राजाराम कांबळे (२१) हे दोन तरुण ठार झाले. याबद्दल अधिक माहिती अशी कि, विकास आणि ऋषीकेश हे दोघे मित्र होते. ते देखावे पाहण्यासाठी शुक्रवारी रात्री दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते. पाटील पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना घासल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. दोघेही पुण्याहून गोव्याकडे जाणार्याक मालवाहू ट्रकवर जोरात आदळले. त्यात एकजण ट्रकच्या मागील चाकात चिरडला गेला, तर दुसरा ट्रकला धडकून जोरात फेकला गेला. यामध्ये ऋषीकेश जागीच ठार झाला; तर विकासचा शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला.दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या अग्नि शमन दलातील जवानांनी अग्निठशमन दलाच्या वाहनातून दोघांना तातडीने रुग्णालयातहलविले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies