Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री शिंदेंच्या खुर्चीवर बसतात श्रीकांत शिंदे? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री शिंदेवर टीकास्त्र!



मुंबई:  राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगताना दिसतो आहे. अशातच खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.



या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहे. हा फोटो ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर'? असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.



दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. रविकांत वरपे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 'हा फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. आम्ही श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत' अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies