Type Here to Get Search Results !

गर्लफ्रेंड समोर बॉयफ्रेंडला केली मारहाण; अपमान झाल्याने तरुणाने.....!



पुणे: पिंपरी चिंचवड भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आळंदी रोडवर गर्लफ्रेंड समोर मारहाण केली म्हणून एका २० वर्षांच्या बॉयफ्रेंड मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली  आहे. प्रतीक संतोष कुतवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश महादू पठारे याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



माहितीनुसार,  प्रतीक संतोष कुतवळ असे त्या तरुणाचे नाव आहे. प्रथमेश महादू पठारे आणि प्रतीक कुतवळची गर्लफ्रेंड ही एकमेकांच्या तोंड ओळखीची होती. जेव्हा प्रतीक आपल्या गर्लफ्रेंडशी बोलत होता, त्यावेळी प्रथमेश महादू पठारे याने त्याला पाहिले आणि त्याचा संताप अनावर झाला. यावेळी प्रथमेश महादु पठारे याने रागात येऊन प्रतीक कुतवळ याच्या गर्लफ्रेंड समोर त्याला जबर मारहाण केली होती. त्यातूनच त्याच्यात आपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने २५ जून २०२२ ला आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.



दरम्यान, या प्रकरणात भोसरी पोलिसांनी तपास करून प्रथमेश महादू पठारे (२० वर्ष) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies