Type Here to Get Search Results !

कलाविश्वातील ‘या’ दिग्गज अभिनेत्रीला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर!



मुंबई- कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार हा अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली. आपल्या दमदार अभिनयाने 60 आणि 70 च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्या 79 वर्षांच्या आहेत. गुजराती कुटुंबातून येणाऱ्या आशा यांच्या आई मुस्लिम आणि वडील गुजराती होते.



60-70 च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. दरम्यान, आशा पारेख यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 80 चित्रपटांमध्ये काम केलं. ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तिसरी मंजिल’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies