Type Here to Get Search Results !

“नेहाने आमचं बालपणच उद्ध्वस्त केलंय.”; ‘यामुळे’ नेहा कक्कर वर भडकले नेटकरी!मुंबई: गायिका नेहा कक्करचा  सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र अनेकदा तिला नेटकऱ्यांकडून ट्रोलही केलं जातं. नुकतंच नेहाच्या नवीन गाण्याचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या ‘सजना’ या गाण्याचा हा रिमेक आहे. मात्र हा रिमेक नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. फाल्गुनीच्या मूळ गाण्याचं नेहा कक्कर व्हर्जन ऐकून काही नेटकरी तिच्यावर भडकले.‘नेहा कक्कर आता पुरे झालं. टी सीरिज तुम्ही खिचडीचं दुकान उघडा. कारण तुम्ही गाण्यांची खिचडी छान बनवता, भयानक आहे हे’, असं एकाने लिहिलं. तर ‘नेहाने आमचं बालपणच उद्ध्वस्त केलंय. अक्षरश: भयंकर आहे हे’, अशा शब्दांत दुसऱ्याने राग व्यक्त केला. तसेच, ‘नेहमीप्रमाणे, नेहाने आमच्या बालपणीच्या या गाण्यासोबतच्या सुंदर आठवणी खराब केल्या आहेत,’ असंही एका युजरने लिहिलं आहे. जुनी गाणी रिमेक का केली जातात, नव्याने गाणी बनवता येत नाहीत का, असाही संतप्त सवाल नेटकऱ्यांनी टी सीरिज कंपनीला केला.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies