Type Here to Get Search Results !

अंत्यविधीवरून परतताना चिमुकलीच्या डोक्यावरून गेले टँकरचे चाक; चिमुकलीचा जागीच मृत्यू!



जळगाव : उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नरडाणे येथील दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या  सोबत असलेली दोन वर्षाची चिमुकली ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. तर पती व पत्नीस मार लागला. सदर घटना चाळीसगाव- धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याजवळ घडली.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, उंबरखेडे (ता.चाळीसगाव) येथील गोरख दिनकर पाटील यांचे भाचजावई तुषार त्र्यंबक भामरे (रा. पिंप्राळा नरडाणे ता. शिंदखेडा) हे दुचाकीने पत्नी हेमांगी व दोन वर्षाची मुलगी गितांजली यांच्यात समवेत उंबरखेड येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर दुचाकीने उंबरखेड येथून नरडाणाकडे जात होते. चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहीवद फाट्याच्या पुढे तुषार भामरे हे रस्त्याच्या कडेने हळूवार खड्डे चुकवत जात असतांना मागाहून येणाऱ्या मालवाहू टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तुषार भामरे हे पत्नी हेमांगी भामरे व त्यांच्या मांडीवर बसलेली मुलगी गितांजली (2 वर्षे) मोटारसायकलवरून खाली पडले. त्याचवेळी गितांजलीच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू  झाला. क्षणात धडक देणाऱ्या टँकरचा चालक रस्त्यावर टँकर सोडून पळून गेला.



दरम्यान, याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies