Type Here to Get Search Results !

“फोडा-झोडा सोडा आणि मराठी माणसाला गाडा हेच तुमचं मिशन”



मुंबई: शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत, म्हणून फोडा-झोडा-मजा पहा, कमळाबाईचे हेच तर मिशन होतं, तसेच, आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जातेय, शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदानं नाचतोय, या शब्दात आजच्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.




दरम्यान, सामनाच्या याच अग्रलेखाला आता भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते याबाबत एक ट्विट करत म्हणाले की, 'दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता, पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सर्त्तेत कोण बसले ? फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies