Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार १७ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

कुटुंबासमवेत वेळ उत्तमपणे घालवाल.  तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. दुसर्याखवर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 


वृषभ:

भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल.


मिथुन:

कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. हट्टीपणे वागू नका.


कर्क:

भागीदारीत फायदा होईल. जबाबदार्यांचा ताळमेळ सांभाळावा. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. शक्यतो वादविवादात पडू नका.अनेक कामे अंगावर पडू शकतात. 


सिंह:

कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील. दुसर्या्स समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. निराशेचे बळी होऊ नका.  


कन्या:

आरोग्याची काळजी घ्यावी. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्यांरकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.


तूळ:

प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. इतरांशी व्यवहाराने वागाल.  


वृश्चिक:

खर्चात वाढ होण्याची शक्यता. अतिसाहस करू नका. दुसर्याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.


धनू:

नियोजनाने वाटचाल करावी.  तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. 


मकर:

स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा.


कुंभ:

प्रवासात सावधानता बाळगा. गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. नवीन लोकांशी मैत्री कराल.


मीन:

परदेशात जाण्याची संधी चालून येईल.  दिवस उत्साहात व आनंदात जाईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies