Type Here to Get Search Results !

आरपीआयच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र खरात यांची निवड!



सांगली : आरपीआयच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र खरात यांची पुन्हा निवड झाली आहे.


आरपीआयचे प्रमुख केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच पक्षाची संपूर्ण कार्यकरिणी बरखास्त केली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्याची कार्यकरिणी बरखास्त झाली होती.


आज सांगली येथे आरपीआयच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षाच्या सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष पदी सर्वानुमते राजेंद्र खरात यांची निवड करण्यात आली. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या सह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies