Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२;जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: 

काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. 



वृषभ:-

घरातील कामात गुंग व्हाल.  आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. 

मिथुन:-

आरोग्यात सुधारणा होईल. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. 



कर्क:-

सारासार विचार करण्यावर भर द्यावा. भावनिक गुंता वाढवू नका.  आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. 



सिंह:-

सामाजिक कामासाठी वेळ द्याल. जोखीम पत्करून काम कराल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.



कन्या:-

समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. दैनंदिन कामात बदल करून पाहावं. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.



तूळ:-

कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा.  आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. नियोजित कामात बदल करू नका. अपुर्‍या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. 



वृश्चिक:-

मानसिक स्वास्थ्य जपावे. गरजूंना मदत कराल.विचारांना योग्य दिशा द्यावी. मित्राची योग्य साथ मिळेल. प्रिय व्यक्तिला दुखवू नका.



धनू:-

विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन घ्यावे.  दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. भावंडांशी नाते दृढ होईल. 



मकर:-

आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल. अति कर्मठपणे वागू नका.  मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल. 



कुंभ:- 

घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. करमणुकीत बराच काळ घालवाल. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी. 




मीन:-

ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल. घराची कामे मार्गी लागतील. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies