Type Here to Get Search Results !

“अमित शाह यांना आव्हान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे”: ‘यांचे’ ठाकरेंना प्रत्युत्तर!



मुंबई: 'स्वत:च्या ताकदीवर तुम्ही कधी सरकार आणले का ? उद्धव ठाकरे यांना आव्हान कुणी कुणाला द्यायचे याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे तुम्ही १०० आमदार निवडून आणलेत का? अमित शाह यांनी १०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणले आहेत. त्यांना तुम्ही आव्हान करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशा शब्दात शेलार यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.



दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये बुधवारी शिवसेनेची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुंबई महापालिका जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies