Type Here to Get Search Results !

दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबला? काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये सामील होणार?



मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात आज भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता ऑक्टोबर मध्ये शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.



माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात वीस मंत्र्यांची वर्णी लागू शकते. त्यात काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. तर दोन महिला आमदारांना देखील या मंत्रिमंडळ विस्तार संधी देणार आहे.



दरम्यान, काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता असल्याने हा विस्तार ऑक्टोबरपर्यत होऊ शकतो. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये कोणते 20 मंत्री घेणार शपथ घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies