Type Here to Get Search Results !

टायगर मेमनच्या कथित नातेवाईकांसोबत किशोरी पेडणेकरांचा व्हिडिओ व्हायरल!




मुंबई: मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीचा वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा रऊफ मेमनबरोबर बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रऊफ मेमन याने याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाने धमकी दिली असल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आरोप हास्यापद असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.



या व्हायरल व्हिडीओ मध्ये, किशोरी पेडणेकर हे एका बैठकीत आहेत. या बैठकीत रऊफ मेमनही उपस्थित आहे. त्याशिवाय, इतर व्यक्ती, अधिकारीदेखील दिसत आहे. ही बैठक बडा कब्रस्तानच्या बैठकीतील असल्याचे म्हटले जात आहे. बडा कब्रस्तान आणि जुमा मशिदीशी संबंधित नसतानाही रऊफ त्या बैठकीत उपस्थित होता अशी माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ 2021 मधील असल्याचे म्हटले जात आहे.



दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आरोप हास्यापद असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies