Type Here to Get Search Results !

“उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये काल शिवसेनेची सभा घेतली. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असा इशारा देत ठाकरे यांनी काल झालेल्या मेळाव्यात भाजपसह शिंदे गटावर तोफ डागली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 



पत्रकार परिषदेत राणे ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले, मातृभूमीसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस आहे. ठाकरे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात. १० आमदार निवडूण आणण्याची ठाकरेंची ताकद नाही. पदासाठी,पैशांसाठी, हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा आहेत. अमित शहांना आव्हान देण्याची औकात आहे का? उद्धव ठाकरेंनी मुंबई बकाल केली. ठाकरेंनी नैराश्यातून कालच्या मेळाव्यात भाषण केलं. उद्धव ठाकरे म्हणजे लबाड लांडगा आहे, अशा कठोर शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies