Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार १३ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

प्रवास लाभदायक ठरू शकतील. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. फसव्या आश्वासनांपासून दूर रहा.


वृषभ:

जोडीदाराला खुश कराल. व्यावसायिक गोष्टीतील संभ्रम टाळावा. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.


मिथुन:

दिवस आपल्या मनासारखा जाईल. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. धडपड करून का होईना काम पूर्ण कराल.


कर्क:

समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल. भावंडांची चिंता लागून राहील. करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.


सिंह:

नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत. मंदी चिंता वाढवणारी असेल. आपली ठाम मते मांडावीत. प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा. व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. 


कन्या:

कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल. चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. घरासाठी योग्य अशी खरेदी कराल.


तूळ:

आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल. कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. 


वृश्चिक:

लोक तुमचा सल्ला मानतील. काहीसा मानसिक त्रास संभवतो. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.   त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका.  रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा. 


धनू:

निष्काळजीपणा करू नका. बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. आत्मविश्वासाने काम करा. मानसिक अस्थिरता टाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. 


मकर:

धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल.  सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा होतील. अति अपेक्षा बाळगू नका. 


कुंभ:

वेळेचा सदुपयोग करावा. लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते. मेहनतीला पर्याय नाही. कलेत मन रमेल. अधिकार्यांिच्या सहकार्याीचा वापर करून घ्या. 


मीन:

हितशत्रूपासून सावध राहावे.  दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies