मुंबई: २५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवरील शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, बंडखोरीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महानगर पालिकेवरील सत्ता काबीज करण्यासाठी नवी रणनीती आखली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांना भेट देत लोकांशी संवाद साधणार आहेत. ६,७,८ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतल्या प्रत्येक विभागातील महत्वाच्या मंडळांना भेट देणार आहेत.
दरम्यान, दसरा मेळाव्या होण्याआधीच एकनाथ शिंदेंनी चाचपणी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर एक बैठक पार पडली. यामध्ये विशेष मुंबईवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.