Type Here to Get Search Results !

“.....त्यामुळे मी कुणाला काम देऊ शकत नाही”: पंकजा मुंडे!



परळी: परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा मोहत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलतांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले.



भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी कुणाला काम दिले तर मला काम मिळेल, सद्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मी कुणाला काम देऊ शकत नाही', असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.



पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की 'सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो', असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies