नाशिक : मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, असा उल्लेख याठिकाणी झाला. पण, या राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यामुळे या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. जात धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे नेतृत्व आपण मानले पाहिजे. त्यांच्यामुळंच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपडे मिळालीत, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज नाशिकमध्ये होते. त्यावेळी बोलत होते.