Type Here to Get Search Results !

बिस्किट आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर किराणा दुकानदारानेच केला अत्याचार!



औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात किराणा दुकानात बिस्किट आणि पाव आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर किराणा दुकानदारानेच अत्याचार केला. लहान मुलीवर अत्या चार करणारा बळीराम असे नराधम आरोपीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीला आईने दुकानात बिस्कीट व पाव घेण्यासाठी पाठविले. मुलगी दुकानात गेली असता दुकानात कोणी नसल्याचे पाहून दुकानदाराने मुलीवर अत्याचार केला. 



दरम्यान, याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सदर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies