Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपने केली पोलिसात तक्रार!



गुहागर: शिवसेनेचे आक्रमक नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे. भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.



माहितीनुसार, गुहागर मध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. देशात दंगली घडवण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केल असल्याचे गंभीर वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात हिंदू मुस्लिम यांच्यात दंगल पेटवेल असेही ते म्हणाले होते.



दरम्यान, भास्कर जाधव यांच्या या वक्तव्या नंतर गुहागर मधील भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पोलिसात तक्रार केलीय.भास्कर जाधव यांचे वक्तव्य निराधार आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला आहे. गुहागर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies