मुंबई: शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली.त्यामुळे आता शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन देखील उभारणारणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे लवकरच, दसरा मेळावा कुठे होणार आहे ते कळवले जाईल असे देखील एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटले आहे.