Type Here to Get Search Results !

“सुप्रियाताईंना २ मुख्यमंत्र्यांची सवय, त्यामुळे त्या....”; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेना टोला!



औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी पैठणमध्ये मुख्यमंत्र्याची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यानी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.



मुख्यमंत्री म्हणाले, ' ताई म्हणातात, अजित दादा सकाळी ६ ला उठून काम करायचे. आधी दादा टीका करायचे आता ताई पण सुरु झाल्या आहेत. टीका करणं विरोधकांचे काम आहे. टीका करणं हा त्यांचा धंदा आहे. अजित पवार ६ ला उठून काम करतात तर हा एकनाथ शिंदे सकाळी ६ पर्यंत करतो आणि ते मी सदैव करत राहणार. शिवाय ताईं २ मुख्यमंत्री हव्या आहेत म्हणाल्या, त्यांना पुर्वीची सवय आहे. त्यावेळी दोन मुख्यमंत्री होते. त्यांचा रिमोट कंट्रोल काढून घेतला आहे. त्यामुळे त्या नाराज आहेत, अशी टोलेबाजी करत मुख्यमंत्र्यानी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies