Type Here to Get Search Results !

राज ठाकरे- शिंदे गटाच्या वाढल्या भेटीगाठी; मनसे- शिंदे गट यांच्यात होणार युती?



मुंबई : आता लवकरच राज ठाकरे देखील वर्षा बंगल्यावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे मनसे-भाजप आणि शिंदे गट यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांना वेग आला आहे.



गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र या सगळ्या भेटीगाठींमध्ये विशेष लक्षणीय भेट ठरली ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची. कारण यानंतरच राज्यात नवीन राजकीय गणित पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 



दरम्यान, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती नक्की शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांची युती होईल आणि याचा थेट परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies