Type Here to Get Search Results !

आता फक्त ‘आवाजावरून’ होणार कोरोना चाचणी; जाणून घ्या कसे ते...!



नवी दिल्ली:  आता कोविड चाचणीच्या कटकटीत सुटका होण्याची शक्यता आहे. फक्त आवाजावरून तुम्हाला कोविडची बाधा झाली आहे का, हे समजणार आहे. यासाठी एक स्मार्टफोन अॅप विकसित करण्यात आले आहे. स्मार्टफोन अॅपच्या तुमच्या आवाजाचे नमुना घेऊन तुम्हाला कोविडची बाधा झाली आहे की नाही, हे सांगणार आहे. ही कोविड चाचणी आर्टिफिशियस इंटेलिजेन्स म्हणजे AI च्या मदतीने होणार आहे. 



संशोधकांच्या माहितीनुसार, हे अॅप अॅण्टीजेन चाचणीपेक्षा अधिक अचूक आहे. त्याशिवाय ही चाचणी अधिक स्वस्त दरात होईल. त्याचा वापरही अधिक सहजपणे केला जाऊ शकतो. ज्या ठिकाणी PCR चाचणी करणे महाग आहे, अथवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे,  अशा ठिकाणी हे अॅप मोठे फायदेशीर ठरणार आहे. चाचणीसाठी कमी वेळ लागणार असल्याने लोकांच्या वेळेची बचत होणार आहे. 



दरम्यान, कोरोना महासाथीच्या आजाराचा परिणाम लोकांच्या आवाजावरदेखील होतो. कोरोनाबाधित लोकांच्या आवाजात किंचित बदल होतो. त्यावरून संशोधक Wafaa Aljbawi आणि त्यांच्या सहकाऱ्याला AI च्या मदतीने व्हॉइस अॅनालाइज करून कोरोना चाचणी करणारे अॅप तयार करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी संशोधक  Mel-spectrogram अॅनालिसिस तंत्राचा वापर करतात. यामुळे लाउडनेस, पॉवर आणि व्हेरिएशनमुळे आवाजातील बदल दिसून येतो. सध्या अॅपने केम्ब्रिज विद्यापीठातून ऑडिओ सॅम्पल जमा गेले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies