Type Here to Get Search Results !

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय: ‘यामुळे’ वन कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार २५ लाख, नोकरी!



मुंबई : आता पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच वन कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.



वन विभागाच्या प्रस्तावानुसार कर्तव्य बजावताना वन कर्मचारी जर कायमचा दिव्यांग झाला तर, त्या वन कर्मचाऱ्यास श्रेणीप्रमाणे ३ लाख ६० हजार रुपये ते ३ लाख इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येईल. अशा प्रकारे कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्याचा उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार करेल, अशीही माहिती देण्यात आली.



तसेच, वनांचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास २५ लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल.



जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर सदर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान इत्यादीमार्गे वहनाचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies