Type Here to Get Search Results !

नीरज चोप्राने जिंकली डायमंड लीग स्पर्धा; किताब पटकावणारा पहिलाच भारतीय खेळाडू!नवी दिल्ली: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग फायनल जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये अॅाथलेटिक्समधल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेची मेगा फायनल पार पडली या स्पर्धेत भारताचा स्टार अॅ्थलीट नीरज चोप्राने डायमंड लीगच्या भालाफेक प्रकारात  ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा किताब पटकावणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.  नीरज चोप्राने झुरिच येथे झालेल्या फायनलमध्ये 88.44 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपद पटकावले. दरम्यान, नीरजने 2021 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2022 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies