Type Here to Get Search Results !

“आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार”; ‘या’ शिवसेना नेत्याचे भाजपला प्रत्युत्तर!



मुंबई :" "मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रथम 150 चा नारा दिला आहे. अमित शाह हे केंद्रीय नेते आहेत, त्यांनी 150 चा नारा देणे म्हणजे आमची कॉपी आहे. शिवाय धोके कोण कोणाला देत आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोके देखील नको आहेत. शिवाय आम्ही पहिल्यापासूनच जमीनीवर आहोत, आम्हाला काय जमीन दाखवणार, तुम्ही आस्मानात आहात ते आम्ही तुम्हाल जमीनीवर आणू, लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशारा शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमित शाह यांच्या टिकेला उत्तर देताना दिला आहे.  



राजकारणात सगळे काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचे असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या टिकेला शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies