Type Here to Get Search Results !

रागाच्या भरात मामानेच केली चार वर्षाच्या भाच्याची हत्या!



बीड : बीड जिल्ह्यात रागवलेल्या भावाची  समजूत काढण्यासाठी गेलेल्या बहिणीचा तिच्या भावासोबत वाद झाला आणि हाच वाद वाढत गेल्याने  रागाच्या भरात भावानेच चार वर्षाच्या भाच्याचा खून केला आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, परळी तालुक्यातील नागपूर येथे राहणाऱ्या सनिक लक्ष्मण चिमणकर यांनी आपला चार वर्षाचा भाचा कार्तिक विकास करंजकर याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे. सनिक चिमणकर हा आपला विवाह करण्यासाठी कुटुंबीयांसोबत नेहमीच वाद घालत होता.  यातूनच तो घरच्या लोकांना मारहाण देखील करायचा म्हणून त्याची समजूत काढण्यासाठी केज तालुक्यातल्या लाडेगाव येथे असलेली त्याची बहीण सुरेखा ही आपल्या चार वर्षाचा मुलगा कार्तिकसह माहेरी आली होती.माहेरी आलेल्या बहिणीने सनिकला समजावून सांगताना वाद झाला आणि हाच राग मनात धरून सनिक याने पहाटेच्या वेळी भाचा कार्तिक याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली.  जखमी झालेला कार्तिक बचावासाठी आरडाओरडा करू लागला. कार्तिकचा आरडाओरडा ऐकून आई सुरेखा धावत आली.  सानिकच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कार्तिकला तिने उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.  त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.



दरम्यान, या प्रकरणी परळी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि आरोपी सनिक चिमणकर याला अटक केली.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies