Type Here to Get Search Results !

'येथे' शिक्षण संस्थेत घुसून आत्मघाती बॉम्बस्फोट;२० जण जागीच ठार!

 


काबुल: अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे  शिक्षण संस्थेत घुसून आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला स्फोटाने उडवून दिले. या भीषण स्फोटात २० जण ठार झाल्याची माहिती आहे.



माहितीनुसार,  आज, शुक्रवारी सकाळी हा स्फोट झाला. काबुलच्या दक्षिणेकडील दस्ती बारची परिसरात एका शिक्षण संस्थेत हा स्फोट झाला. सुसाइड बॉम्बरने शैक्षणिक संस्थेत घुसून स्वतःला बॉम्बस्फोटाने उडवून दिले.




बॉम्बस्फोट घडवून आणला त्यावेळी अनेक विद्यार्थी सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करत होते. या हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तर २७ पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. 




दरम्यान, या हल्ल्यानंतर सुरक्षा दले घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले. नफी टकोर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies