नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होत आहे. दरम्यान,आज गुरूवारी सोन्याचे दर पुन्हा घसरले आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.21 टक्क्यांनी घसरली आहे. सोन्याबरोबर चांदीचे दरही घसरले असून गुरुवारी चांदीचा दर 172 रुपयांनी घसरून 57,126 रुपये किलो झाला आहे.
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे:
चेन्नई - 50,730 रुपये
दिल्ली - 50,110 रुपये
मुंबई - 49,960 रुपये
नागपूर - 49,990 रुपये
पुणे - 49,990 रुपये