Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे यांच्यासारखे आम्ही हिंदु सणांना विरोध करणारे... '; ‘यांचा’ उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!



मुंबई:  हिंदू सण हा भाजपाचा आत्मा असून आम्ही कोरोना काळातही सण अखंडित ठेवण्याचा प्रयत्न‍ केला. कोरोनाचे संकट टळल्यानंतर दहिहंडी उत्सव भाजपाने जोरदार साजरा केला, आता गणेशोत्सवात ही भाजपा हिरहिरीने सहभागी झालो आहोत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर करताच त्याला मंडळाचां प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मुंबईतील १०२६ मंडळे सहभागी झाली आहेत'.



'सहभागी गणेश मंडाळाचे परिक्षण ३० पथके करणार असून प्रत्ये्क पथकात कॅमे-यासह ३ जण असून एकूण ९० जणांचा समावेश असलेली ही पथके या सगळयांचे परिक्षण करणार आहेत. कोराना काळात दुदैवाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १०० वर्षांची लालबागच्याण राजाची परंपरा खंडित केली. अशा प्रकारे हिंदु सणांना विरोध करणारे आम्ही नाही, भाजपा सणांची परंपरा जोपासणारा पक्ष आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.



दरम्यान, मुंबई भाजपातर्फे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सपव स्पंर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये‍ 1026 मंडळे सहभागी झाली आहेत. या मंडळाचे परिक्षण करण्या साठी तज्ञांची 30 पथके तयार करण्यावत आली आहेत. आज मुंबई भाजपा कार्यालयाजवळून या पथकांच्याय गाडयांना आमदार अॅड आशिष शेलार यांनी झेंडा दाखवून सन्मायनाने रवाना केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies