Type Here to Get Search Results !

पूजेच्या ‘या’ व्हिडीओवरून अभिनेत्री अंकिता लोखंडेवर संतापले नेटकरी...:पहा व्हिडीओ!



मुंबई: अभिनेत्री अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 



काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता रितीरिवाजानुसार पूजा करताना दिसत आहे. मात्र व्हिडीओमधील तिचं कृत्य पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये अंकिता लाल रंगाच्या साडीत ट्रेडिशनल अंदाजात दिसत आहे. तर तिचा पती विकी जैनदेखील पारंपारिक पोशाखात पहायला मिळत आहे. मात्र पूजेदरम्यान अंकिताच्या काही कृती नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या नाहीत.  या व्हिडिओमध्ये अंकिता डान्स करताना दिसत आहे. तसेच, ती पूजेदरम्यान कॅमेरासमोर पोज देतानाही दिसत आहे. नेटकऱ्यांना तिचं हे वागणं आवडलं नाही आणि त्यांनी कमेंट करून तिला प्रचंड ट्रोल केलं. एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, ‘पूजेदरम्यानही डान्स सुरू आहे.’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिलं, ‘देवाचा तरी आदर करा, इथेही नौटंकी सुरू आहे.’ तर सर्वकाही रेकॉर्ड करणं आवश्यक आहे का, असेही एकाने म्हटले आहे.



दरम्यान, काही नेटकरी अंकितावर टीका करत असले तरी काहींना तिची ही धार्मिक बाजू आवडली आहे. लग्नानंतर प्रत्येक पूजा परंपरेनुसार पार पाडत असल्याचं पाहून छान वाटतं, असं तिच्या चाहत्यांनी म्हटलंय. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies