मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरूवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आता पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिकसह पुणे विभागात मुसळधार पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.