Type Here to Get Search Results !

जेवण करण्यास नकार दिल्याने पतीने केले पत्नीसोबत भयंकर कृत्य!



देहरादून:  देहरादूनमधील दलनवाला येथे एका 72 वर्ष पतीने आपल्या 53 वर्षांच्या पत्नीची हत्या केली. पत्नीने रात्रीचे  जेवण करण्यास नकार दिला म्हणून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आरोपीचे नाव राम सिंग असे आहे. त्याने पत्नी उषा देवी हीची हत्या केली.   


याबद्दल अधिक माहिती अशी कि, राम सिंग हा एक फास्टफुडचा स्टॉल चालवण्याचे काम करतो. राम सिंहने आपल्या पत्नीला बॅटने जबर मारहाण केली होती. यात पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी राम सिंह यांने रुग्णालयात फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. पत्नी शिडीवरुन पडून जखमी झाल्याचं त्याने सांगितले . पण रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर राम सिंहची पत्नी उषा देवी यांना मृत घोषित करण्यात आले. 



दरम्यान,  पोलिसांच्या चौकशीदरम्यान राम सिंह यानेच पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले, त्यामुळे पोलिसांना आरोपी राम सिंह याला अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies