भोपाळ: “गरबा मंडपात आयडी चेक करूनच सर्वांना प्रवेश दिला पाहिजे. मंडपात मुस्लिम समुदायाला प्रवेश दिला जाऊ देऊ नये. आम्हाला आमची पूजा पद्धती शुद्ध ठेवायची आहे. आमच्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम समुदायांनी तयार केलेली कोणतीही वस्तू असता कामा नये. मंडपाच्या आसपास मुस्लिमांची दुकाने असता कामा नये. त्यांची दुकाने असल्यास त्या दुकानातून सामान खरेदी करू नका”, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे.
दरम्यान, देशभरात नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. संपूर्ण देशात मंडपांमध्ये देवीची पूजा केली जात असून गरब्याचं आयोजनही केलं जात आहे. मात्र, यंदा गरब्याच्या मंडपावरून मध्य प्रदेश सरकारने काही कठोर निर्देश जारी केले आहेत. गरबा मंडपातील एंट्रीपासून ते सुरक्षेपर्यंतच्या विविध मुद्द्यावर जिल्हा प्रशासनाला गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.